अंतर्गत लेखा परीक्षण पथक (जमा), सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखापरीक्षणाशी संबंधित प्रलंबित परिच्छेद, अनुपालन, नोंदी, दस्तऐवज व प्रशासकीय आढावा यासाठी ही अधिकृत डिजिटल प्रणाली आहे.
अंतर्गत लेखा परिक्षण पथक (जमा) बद्दल
शासन महसूलाची हानी टाळण्यासाठी व अधिनस्त कार्यालयांचे महसूली जमेचे लेखापरिक्षण करण्यासाठी स्थापन पथक.
लोकलेखा समितीच्या शिफारशीनुसार दि. 14 एप्रिल 1977 अन्वये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात अंतर्गत लेखा परिक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त कार्यालयांचे महसूली जमेचे लेखापरिक्षण करुन शासनाच्या महसूलाची होणारी हानी टाळण्याच्या उद्देशाने या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या पथकामार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे अधिनस्त एकूण 14 कार्यालयांचे लेखापरिक्षण केले जाते.
IAW Sindhudurg वेब ॲप्लीकेशन चा उद्देश
लेखापरीक्षण, अहवाल, अनुपालन आणि प्रगती आढावा Online पद्धतीने जलद व सुलभ करण्यासाठी.
अंतर्गत लेखा परिक्षण पथकाकडून केली जाणारी सर्व कामे जलद व सुलभरितीने Online पद्धतीने करण्यासाठी IAW Sindhudurg नावाचे वेब ॲप्लीकेशन करण्यात आले आहे.
पथकाकडून केल्या जाणाऱ्या लेखापरिक्षणाची कार्यवाही, लेखा परिक्षण अहवाल तयार करणे, प्रगती अहवाल तयार करण्याची सुविधा यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच परिच्छेदाचे अनुपालनही ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
याकरिता सर्व उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, तहसिलदार तसेच लेखा परिक्षण पथक व सहायक यांना एकूण 36 Logins उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी
श्रीम. तृप्ती धोडमिसे, भा.प्र.से
Collector & District Magistrate
निवासी उपजिल्हाधिकारी
श्री. मच्छिंद्र सुकटे
Resident Deputy Collector