उपलब्ध सुविधा
प्रलंबित परिच्छेदांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी एकत्रित डिजिटल सुविधा.
प्रलंबित परिच्छेदांचा निपटारा जलद गतीने होण्याकरिता जुने परिच्छेद सुलभरित्या उपलब्ध होणे व अनुपालन अहवाल सादर करण्यात सुसुत्रता यावी याकरिता सदर ॲप्लीकेशनमध्ये एकूण 740 प्रलंबित परिच्छेदांचा तपशील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
त्यातील सर्वात जुना प्रलंबित परिच्छेद 1986 मधील आहे. प्रलंबित परिच्छेदांची परिशिष्टे सर्व कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या माहितीचा वापर करुन सर्व कार्यालयांना प्रलंबित वसूलीचे काम सुलभतेने करता येणार आहे. तसेच अनुपालन सादर करण्याचे काम ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
IAW Sindhudurg वेब ॲप्लीकेशन मध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक प्रगती अहवाल, पथक सदस्यांच्या दैनंदिनी याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मुंबई वित्तीय नियम 1959 मध्ये दर्शविलेल्या वित्तीय औचित्याचे योग्यरित्या पालन होवून वसूलीच्या सर्व रकमा शासनखाती योग्य लेखाशिर्षाखाली जमा होतील तसेच विभागात होणाऱ्या वित्तीय अनियमीततांना आळा बसावा याकरिता IAW Sindhudurg वेब ॲप्लीकेशनचा वापर होणार आहे.